Marathi District Collectorate, Thane
 

Home

 
 
 

 
 

Thane Tourism

 
 
 

सिद्धिविनायक महागणपती मंदिर, टिटवाळा

siddhivinyak

कल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथे श्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले. महागणपती मंदिर व विठ्ठल मंदिर यामुळे माहात्म्य प्राप्त झालेले एक यात्रास्थान आहे. टिटवाळा येथील गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील आठ प्रसिध्द गणपती मंदिरापैकी एक आहे. येथे पूर्वी कण्वऋषींचा आश्रम होता.

 

शकुंतलेने याच महागणपतीची पुजा केली असे सांगितले जाते आणि म्हणुनच या श्री महागणपतीस 'विवाहविनायक' असे म्हटले जाते.

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावरून सूटणा-या कसारा, आसनगाव व टिटवाळा ह्या गाड्यांनी या प्रसिद्ध मंदिरात जाता येते. स्टेशनपासून हे गाव थोडे दूर आहे. तेथे बससेवा उपलब्ध आहे. सदरचे मंदिर टिटवाळा स्टेशनपासून 3 कि.मी. अंतरावर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी स्टेशनपासून रिक्षा किंवा घोडागाडीचा उपयोग होतो.

............................................................................................................................................................................................

 

हाजीमलंग गड, कल्याण

hajimlang

ठाणे जिल्हयातील कल्याणच्या दक्षिणेस सुमारे 15 कि.मी. अंतरावर मलंगगड किल्ला आहे. मलंगगड हे धार्मिक स्थान श्री मलंग किंवा हाजी मलंग या नावाने ओळखले जाते. मलंगगड हा किल्ला शिलाहार राजाने बांधला. येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर आहे आणि हाजीमलंग या मुसलमान साधूची कबर आहे. या कबरीच्या पूजेचा मान आजही हिंदूकडेच आहे. माघ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते.

 

रायगड जिल्हयातील अन्य किल्ल्याप्रमाणेच माथ्यावर अवघड सुळका, खाली थोडी माची आहे. ठाणे जिल्हयाच्या रायगड जिल्हयाच्या सरहद्दीवर या किल्यावर बाबामलंग यांची समाधी आहे. किल्ल्यावरील पुजास्थानाच्या वर बराच उंच डोंगर आहे. तेथे तटबंदी, प्रवेशद्वार पाण्याची तळी, बुरुज आढळतात. अगदी उंचावरुन आजूबाजूला पाहिल्यास कुर्ला-मुंबईचा परिसर, पनवेलपर्यंतचा प्रवेश, तसेच माथेरानचा प्रदेश दिसतो. कल्याण स्थानकावरुन गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी बसचा उपयोग होतो.
मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकाहून अर्ध्या तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोहचता येते. गडाच्या निम्म्या उंचीवर तेथील सुप्रसिद्ध हाजीमलंग दर्गा आहे. गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून २ तास लागतात.

............................................................................................................................................................................................

TOP OF PAGE

 

शिवमंदिर - अंबरनाथ

shivmandir

इ.स. 1060 साली चित्राराजा यंानी या मंदिराची स्थापना केली. व हे मंदिर सर्वांत जुनं व ऐतिहासिक मंदिर म्हणून ओळखल जात. अंबरनाथचे शिवमंदीर हे संपूर्ण भारतवर्षातील पहिले भूमिज मंदीर जे अत्यंत कलात्मक आहे. शिल्पवैभवाची साक्ष देत वर्षानुवर्षे उन-पाऊस आणि काळाचा आघात सहन करत असलेले स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे "अंबरनाथचे शिवमंदिर". अंबरनाथच्या या प्राचिन शिवमंदिराचा समावेश

 

युनेस्कोने जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न वास्तूत झाला आहे. हे मंदिर पूर्ण दगडानी कोरलेलं असून, मंदिराची जमिन ही वाघाच्या कातडीपासून कोरलेलं आहे. अंबरनाथ हा तालुका शिवमंदिरामुळे प्रसिध्द झाला आहे.

............................................................................................................................................................................................

 

वज्रेश्वरी

vajershvari

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी हे गाव गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडांमुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांमधील महत्त्वाचे स्थळ आहे. हे स्थळ तानसा नदीकाठी वसलेले असून येथे श्रीनित्यानंद महाराजांची समाधी आहे. येथे चिमाजी अप्पांनी बांधलेले वज्रेश्वरी देवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे अकलोली व गणेशपुरीतील गरम पाण्याचे झरे. या झर्‍यांतून औषधी गुणधर्म असलेले गरम पाणी वाहत असल्याचे मानले जाते.

मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्टेशनपासून हे मंदीर जवळ आहे.

 

............................................................................................................................................................................................

 

माळशेज घाट

malshej

हा मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगेतील घाट असून येथील परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. हा राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील घाट आहे. सैबेरियातून येणाऱ्या गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात. पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागेल.

हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध व विकसित झाले आहे. प्रामुख्याने पावसाळ्यात पर्यटक येथे गर्दी करतात. जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटी च्या बऱ्याच गाड्या पुणे मुंबईहून ये - जा करत असतात.

............................................................................................................................................................................................

TOP OF PAGE

 

Home       |      About This Site      |      Terms of Use      |          Disclaimer and Policies     |    Contact Us

 

This is an Official Website of Thane District. All Rights Reserved

NIC

Designed by National Informatics Centre, Thane.
Caution/Disclaimer: This information is supplied by the various departments.
National Informatics Centre will not be responsible for any information that may be inadvertently incorrect.