• Slide

  ठाणे शहर

 • Slide

  वाशी पूल

 • Slide

  कचराळी तलाव

 • Slide

  दादोजी कोंडदेव स्टेडियम

 • Slide

  येऊर

 • Slide

  मासुंदा तलाव

 • Slide

  गडकरी रंगायतन

 • Slide

  टाऊन हॉल

 • Slide

  मनोरूग्णालय ठाणे

ठाणे तालुका

      ठाणे तालुका हा मुंबईच्या लगत असलेला ठाणे जिल्हयातील महत्वाचा तालुका असून मुंबईचे प्रवेशव्दार असेच या तालुक्याचे वर्णन करता येईल. मुंबईच्या सानिध्यामुळे तालुक्याचे पूर्णत: नागरीकरण झालेले आहे. ठाणे शहरामध्ये मुख्यालय असल्याने या तालुकयास ठाणे तालुका असे संबोधले जाते.

      या तालुक्यामध्ये संपूर्णत: नागरीकरण झालेले असून या तालुक्यामध्ये ठाणे, नवी मुंबई व मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. प्राचिन काळापासून ठाणे हे महत्वाचे शहर म्हणून प्रसिध्द आहे. ठाणे शहराचा इतिहास इसवीसन 9 व्या शतकापासून सुरु होतो, यावेळी हे शहर श्रीस्थानक नावाने प्रसिध्द होते व यावेळी शालीहार हे राज्यकर्ते या ठिकाणी राज्यकारभार करीत होते. यानंतर 12 व्या शतकात गुजरातचा सुलतान महमूद याने ठाणे ही ‘सुभा’ प्रांताची राजधानी बनविली. यानंतर सन 1530 ते 1739 या कालावधीत पोर्तूगीजांनी ठाणे येथे राज्य केले. यानंतर स्वातंत्रयपूर्व काळापर्यंत ब्रिटींशांचा वावर येथे होता, याच काळात ठाणे किल्ला (सध्याचे सेंट्रल जेल) याचे निर्माण करण्यात आले.

       स्वातंत्रयोत्त्र कालखंडात औदयोगिकीकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली व ठाणे शहर मुंबई लगत असल्याने औदयोगिकीकरणाचा प्रसार मुंबई बाहेर सर्वप्रथम ठाणे येथे झाला याचेच दयोतक म्हणजे मुंबई ठाणे दरम्यान सर्वप्रथम रेल्वे दि.16/04/1853 रोजी धावली. वाढत्या औदयोगिकीकरणामुळे ठाण्यातील जमिनी मोठयाप्रमाणात उदयोगांसाठी उपलब्ध्‍ करुन देण्यात आल्या व ठाणे लगतचा परिसर उदयोगनगरी म्हणून ओळखला जावू लागला, यामुळे नागरीकरणाच्या प्रक्रियेला अधिक वेग मिळाला व दिवसेंदिवस ठाणे व परिसराची लोकसंख्या वाढू लागली. स्वातंत्रयोत्त्र काळामध्ये मुंबईचा विस्तार झपाटयाने झाला व वाढत्या नागरीकरणाचा, लोकसंख्येचा भार मुंबई शहरात पेलवेना झाल्याने मुंबईच्या लगत नवी मुंबई हे विकसित शहर बसविण्याचे निश्चित करण्यात आले व सन 1970 च्या दशकात सिडको या संस्थेकडे विकसित करण्यासाठी जबाबदारी टाकण्यात आली व यातून नवी मुंबई हे विकसित शहर ठाणे तालुक्यात उभारण्यात आले.

       तसेच दिवसेंदिवस वाढणा-या लोकसंख्या, नागरीकरण यांची पूर्तता करणेकरिता ठाणे तालुक्यात मिरा-भाईंदर महानगरपालिका स्थापन करण्यात आली.

      काळानुरुप ठाणे तालुक्यात आगरी, कोळी, भंडारी लोकांची वस्ती असलेला तालुका ते औदयोगिक दृष्टया महत्वाचा प्रदेश व तदनंतर नागरीकरण झालेले क्षेत्र असे बदल दिसून येतात.

Tahasildar

श्री. के के भदाणे

तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी, ठाणे