• संकेतस्थळ निर्देशक
  • Accessibility Links
बंद

संजय गांधी निराधार योजना

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत

संजय गांधी निराधार योजना
तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे
Email ID – sgycollectorofficethane01@gmail.com

केंद्र शासन पुरस्कृत

  • राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना

राज्य शासन पुरस्कृत

  • संजय गांधी निराधार अनुदान योजना
  • श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

ठाणे जिल्हा स्तरीय यंत्रणा

  • ठाणे ग्रामीण
  • ठाणे शहरी
  • भिवंडी ग्रामीण
  • भिवंडी शहरी
  • कल्याण ग्रामीण
  • कल्याण शहरी
  • मुरबाड
  • शहापुर
  • उल्हासनगर
  • अंबरनाथ ग्रामीण
  • अंबरनाथ शहरी

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

निकष :

  • दारिद्रय रेषेखलील कुटुंबातील १८ ते ६४ वर्ष वयोगटातील कोणत्याही कमावत्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यास, मृताच्या कुटुंबाला /वारस लाभार्थीला एक रकमी लाभ दिला जातो.
  • केंद्र शासनामार्फत एक रकमी रुपये २०,००० अनुदान.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना

निकष :

  • ६५ व ६५ वर्षावरील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेले वृध्द निराधार स्त्री व पुरुष लाभार्थी.
  • DBT प्रणाली मार्फत मासिक रुपये 1500/- अनुदान

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना

        निकष :

  • दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये नाव असलेल्या ४० ते ६५ वर्ष वयोगटातील विधवा लाभार्थी.
  • विधवा महिला, घटस्फोटीत महिला, परित्यक्त्या महिला, अत्याचारित व वैश्या, तृतीयपंथी लाभार्थी.
  • DBT प्रणाली मार्फत मासिक रुपये 1500/- अनुदान

इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना

निकष :

  • १८ ते ६५ वर्ष वयोगटातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेले लाभार्थी.
  • ८०% टक्क्याहून जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्ती.
  • माहे ऑक्टोबर, 2025 पासुन DBT प्रणाली मार्फत मासिक रुपये 2500/- अनुदान.

संजय गांधी निराधार अनुदान योजना

निकष :

  • ६५ वर्षापेक्षा कमी वय असलेला लाभार्थी.
  • वार्षिक उत्पन्न रुपये २१,००० व दिव्यांग लाभार्थ्यासाठी रुपये 50,000 असावे.
  • दिव्यांग, दुर्धर रोगग्रस्त, निराधार पुरुष/महिला, विधवा घटस्फोटीत, परित्यक्त्या महिला, अनाथ मुले, तृतीयपंथी लाभार्थी.
  • DBT प्रणाली मार्फत मासिक रुपये 1500/- अनुदान व माहे ऑक्टोबर, 2025 पासुन दिव्यांग लाभार्थ्यांना मासिक रुपये 2500/- अनुदान.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

निकष :

  • ६५ व ६५ वर्षावरील लाभार्थी.
  • दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव नसलेल्या व रुपये २१,००० पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या वयोवृध्द निराधार स्त्री व पुरुष लाभार्थी.
  • DBT प्रणाली मार्फत मासिक रुपये 1500/- अनुदान.

राज्य शासन पुरस्कृत व केंद्र शासन पुरस्कृत योजनेकरिता आवश्यक असलेले दस्तऐवज

  • कुटुंबाचे नाव ग्रामीण/शहरी भागाच्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रूपये ५०,०००/- तर इतर सर्व लाभार्थ्यांकरीता रूपये २१,०००/-पर्यंत असावे.
  • रहिवाशी दाखला (ग्रामसेवक/ग्राम महसूल अधिकारी/मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या दाखला ग्राहय धरण्यात येईल) सदर दाखला सेतू तसेच महा ई-सेवा यांचेमार्फत प्राप्त करून घेता येईल.
  • अपंगाचे प्रमाणपत्र (अस्थिव्यंग, अंध, मुकबधिर, कर्णबधिर, मतिमंद यांचे अपंगत्वाबाबत अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ मधील तरतुदीप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हील सर्जन) यांचे प्रमाणपत्र
  • अनाथ असल्याचा दाखला (ग्रामसेवक/मुख्याधिकारी/प्रभाग अधिकारी यांनी दिलेला व गटविकास अधिकारी/प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी सांक्षाकित केलेला दाखला.
  • पतीचा मृत्यू दाखला. (विधवा लाभार्थी साठी).
  • रेशनकार्ड
  • आधार कार्ड
  • मुलांचे जन्म दाखले/मुलांच्या वयाचा पुरावा.
  • अर्जदाराचा वयाचा पुरावा.
  • कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसल्याबाबत दाखला (जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांचा दाखला (विधवा लाभार्थी साठी).
  • नावात बदल असलेबाबतचा पुरावा.
  • 2 फोटो
केंद्र पुरस्कृत योजना राज्य पुरस्कृत योजना
अ.क्र. तालुका इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना (सर्वसाधारण) संजय गांधी निराधार अनुदान योजना  (अनु. जाती) संजय गांधी निराधार अनुदान योजना (अनु.जमाती) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (सर्वसाधारण) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (अनु. जाती) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (अनु.जमाती)
ठाणे ग्रामीण 14 0 0 0 576 188 8 132 40 0
ठाणे मनपा 26 0 0 0 1511 417 57 643 135 16
भिवंडी ग्रामीण 668 0 0 74 3244 188 703 2429 116 414
भिवंडी मनपा 382 0 0 0 2919 172 15 1282 170 9
कल्याण ग्रामीण 69 37 0 9 669 70 47 105 11 17
कल्याण मनपा 54 11 0 6 1058 253 16 625 84 4
मुरबाड 321 0 0 79 2082 204 447 756 69 227
शहापूर 668 272 0 215 1811 196 613 518 52 174
उल्हासनगर 146 15 0 0 792 543 57 490 254 39
१० अंबरनाथ ग्रामीण 147 8 0 0 348 119 91 40 12 27
११ अंबरनाथ नपा 72 0 0 6 2758 795 174 1114 221 52
जिल्हा ठाणे एकूण 2567 343 0 389 17768 3145 2228 8134 1164 979