बंद

माळशेज घाट

कल्याण नगर रस्त्यावर माळशेज घाट आहे. आतापर्यंत पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून हे प्रचलित असले तरी लवकरच महाबळेश्वर व माथेरानप्रमाणेच एक बारमाही थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित होत आहे. पावसाळ्यात दाट धुक्याची शाल पांघरलेला हा डोंगर द-याचा परिसर पर्यटकांना वेड लावतो. आता घाटात पर्यटकांसाठी खास पॉइंटकेले जात आहेत.पर्यटकांच्या वाहनांसाठी रस्त्यावर दोन ठिकाणी खास पार्किंग व्यवस्था केली आहे. एम.टी.डी.सी. व वन विभागाने घाट परिसरात विकासकामे हाती घेतली असूनत्यातून पर्यटकांना सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

छायाचित्र दालन

  • पावसाळ्यातील माळशेज घाट
  • माळशेज घाटातील धबधबे
  • माळशेज घाटातील पर्यटनस्थळ

कसे पोहोचाल?:

विमानाने

विमानतळ - मुंबई , पुणे

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्टेशन - कल्याण

रस्त्याने

मुंबई - माळशेज घाट : 126 कि.मी. मुंबई - ठाणे - कल्याण - मुरबाड - शिवले- सरळगाव - टोकावडे- माळशेज घाट . पुणे- माळशेज घाट : 118 कि.मी. पुणे - चाकण- राजगुरुनगर -पेठ -मंचर- नारायणगाव- जुन्नर- माळशेज घाट.