• संकेतस्थळ निर्देशक
  • Accessibility Links
बंद

पुनर्वसन

  • परिचय

        महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1976, 1986, 1999 च्या तरतुदी लागू असलेल्या  ठाणे जिल्हयातील पाटबंधारे क्षेत्रातील बुडीत क्षेत्रातील मुळ बाधित भूधारकांच्या कुटूंबातील नामनिर्देशित सदस्याची पात्रता, अनुज्ञेयता याबाबत तपासणी करुन प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित/हस्तांतरण करण्याची कार्यवाही केली जाते. तसेच  ठाणे जिल्हयातील पाटबंधारे प्रकल्पामध्ये बाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाशी संबंधीत कामे व तद्अनुषंगिक कामे या पुनर्वसन विभागामार्फत केली जातात.

  • सद्यस्थितीत पुनर्वसनाशी संबंधित सुरु असलेल्या प्रकल्पांची नावे
  1. कोयना धरण जल विद्युत प्रकल्प
  2. बारवी धरण प्रकल्प
  3. भातसा धरण प्रकल्प
  4. कोयना अभयारण्यांतर्गत सहयाद्री व्याघ्र प्रकल्प
  5. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड (बुलेट ट्रेन) रेल्वे प्रकल्प
  6. डेडिकेटेड फ्रेट कॉरीडॉर प्रकल्प
  • प्रकल्पग्रस्त दाखला काढण्याकरीता/हस्तांतरीत करणेकरीता आवश्यक कागदपत्रे
  1. अर्जदाराचा अर्ज
  2. पुर्वी दिलेला मुळ प्रकल्पग्रस्त दाखला
  3. सद्यस्थितीतील भूसंपादन नोंदीचा 7/12 व जुना भूसंपादन नोंदीचा फेरफार
  4. भूसंपादन नोटीस
  5. भूसंपादन निवाडयाची प्रत
  6. सक्षम प्राधिकारी यांचा भूसंपादन दाखला
  7. मुळ खातेदारापासून सर्व वारसांचे तहसीलदार यांचे समोरील सर्वांचे संमतीपत्र
  8. तहसीलदार यांचे समोरील मुळ खातेदारापासून सर्व वारसांच्या वंशावळीचे प्रतिज्ञापत्र
  9. प्रकल्पग्रस्त दाखला पुर्वी घेतला असल्यास प्रकल्पग्रस्त दाखला न वापरल्याबाबतचे तहसीलदार समोरील प्रतिज्ञापत्र
  10. ज्यांचे नावे प्रकल्पग्रस्त दाखला काढावयाचा आहे त्याचे आधारकार्ड व शाळा सोडल्याचा दाखला.
  • प्रकल्पग्रस्त दाखला काढण्याकरीता असलेले शासन निर्णय
  1. प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या शासकीय सवेतील वर्ग-3 व वर्ग-4 मधील भरतीबाबत प्राधान्यक्रम शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी, 1980
  2. प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना नोकरीसाठी देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रात प्रकल्पग्रस्ताची सून व नातू यांचा समावेश करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 14 सप्टेंबर, 1994
  3. प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना नोकरीसाठी देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रात प्रकल्पग्रस्तांची सून, नातू व नात (मुलाची अविवाहीत मुलगी) यांचा समावेश करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 22 मे, 1996
  4. प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना नोकरीसाठी देण्यात येणारे प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त व्यक्तीवर अवलंबून असलेल्या व्यक्तीत कायदेशीर दत्तक पुत्राचा समावेश करणेबाबत शासन निर्णय दिनांक 20 मार्च, 1997
  5. प्रकल्पग्रस्त व्यक्तीला अथवा प्रकल्पग्रस्त व्यक्तीच्या कुटूंबातील तिच्यावर अवलंबून असलेऱ्या व्यक्तीला नोकरी विषयक सवलतीलच्या संदर्भात द्यावयाचा दाखला शासन निर्णय दिनांक 07 डिसेंबर, 2000
  6. प्रकल्पग्रस्त व्यक्तीच्या विवाहीत मुलीस किंवा तिच्या मुलांना प्रकल्पग्रस्तांचा दाखला देणेबाबत शासन निर्णय दिनांक 30 ऑक्टोबर, 2001
  7. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची डुप्लीकेट प्रत देणेबाबत शासन निर्णय दिनांक 04 जून, 2004
  8. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबतच्या अटी शिथील करण्याबाबत शासन पत्र दिनांक 19 सप्टेंबर, 2024
  9. प्रकल्पग्रस्त व्यक्तींना व त्यांनी नामनिर्देशित केलेल्या त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करतांना अनुसरावयाची कार्यपध्दती शासन निर्णय दिनांक 29 जानेवारी, 2025
  • प्रकल्पग्रस्त दाखला हस्तांतरीत करणेकरीता असलेले शासन निर्णय
  1. प्रकल्पग्रस्त दाखल्याचे हस्तांतरण करणेबाबत शासन निर्णय दिनांक 02 मे, 2016
  2. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दाखला हस्तांतरीत न करण्याबाबतची कालमर्यादेची शिथील बाबत शासन निर्णय दिनांक 25 फेब्रुवारी, 2025
  • इतर महत्वाचे शासन निर्णय
  1. लाभ क्षेत्र नसलेल्या प्रकल्पांमुळे (पाटबंधारे प्रकल्पाव्यतिरीक्त अन्य प्रकल्प) बाधित व्यक्तींना पुनर्वसनाच्या देय सुविधाबाबत शासन निर्णय दिनांक 17 एप्रिल, 2006
  2. प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना तसेच भूकंपग्रस्तांना शासकीय सेवेतील गट क व गट ड पदावर नियुक्ती देणेबाबत शासन निर्णय दिनांक 27 ऑक्टोबर, 2009
  3. प्रकल्पग्रस्तांची पदे व प्रतिक्षायादीबाबत शासन निर्णय दिनांक 07 मे, 2011
  4. बारवी धरणाची उंची वाढल्यामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पबाधितांना पाण्याच्या वापराच्या समन्यायी संबंधित आस्थापनेवर निमणूकीबाबत शासन निर्णय दिनांक 18 सप्टेंबर, 2017

2 रा मजला, कलेक्टर ऑफिस ठाणे ,
जिल्हा सत्र न्यायालयासमोर,
कोर्टनाका , ठाणे पश्चिम

  • दूरध्वनी क्रमांक – 022-25340893
  • मेल drothane@gmail.com