बंद

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान : टप्पा १

सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांचे महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नवीन तरतुदींची जनजागृती करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे आणि नागरिकांना ‘Single Day Service Delivery’ (एकाच दिवसात सेवा) पुरविणे, या उद्देशाने मार्च ते मे २०२६ या कालावधीत राज्यात महसूल मंडळ स्तर तसेच नगर परिषद व नगर पंचायत पातळीवर “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१” राबविण्यात येत आहे.