बंद

कसे पोहचाल?

रस्त्याने

ठाणे नियमित बसेसद्वारे चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील वाहतूक महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एमएसआरटीसी) द्वारे पुरवली जाते. ठाणेमध्ये एक मध्यवर्ती बस स्थानक आहे. हे स्थानक भारतातील सर्व शहरे आणि जवळपासच्या जिल्ह्यांशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. शहरात विविध खाजगी बस सेवादेखील कार्यरत आहेत.

रेल्वे मार्गे

देशाच्या कोणत्याही भागातून रेल्वेमार्गे सहजपणे ठाण्याला पोहोचू शकतो. ठाणे ते भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये नियमित रेल्वेगाडया आहेत व इथे रेल्वे वाहतूक व्यवस्था सर्वात सोयीस्कर मानली जाते. ठाणे हे मुंबई उपनगरातील नेटवर्कवर सर्वात व्यस्त स्थानक आहे.

हवाई मार्गे

ठाणे शहराचे स्वतःचे असे विमानतळ नाही. मुंबईतील छत्रपती शिवाजी विमानतळ ठाणेहून 16 किलोमीटर अंतरावर आहे. विमानतळ भारतातील सर्व मोठ्या शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे.