सैनिक कल्याण विभाग, पुणे, महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा तपशिल सोबत जोडलेल्या परिशिष्ट प्रमाणे आहे. (Hyperlink of following schemes)
मालमत्ता कर :- (येथे क्लिक करा)
योजनेचा लाभार्थी होण्यासाठी खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
१. या योजनेचे लाभ मिळण्यासाठी सदर माजी सैनिक महाराष्ट्र राज्यात जन्मलेला असावा किंवा महाराष्ट्र राज्याचा किमान १५ वर्षे सलग रहिवासी असावा. त्याकरीता त्याने सक्षम अधिकाऱ्याकडून अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
२. अशी पात्र व्यक्ती राज्यातील एकाच मालमत्ते करीता करमाफीस पात्र राहील. तसे घोषणापत्र त्यांनी संबंधित जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांना सादर करणे आवश्यक राहील.
३. या योजनेचे लाभ संबंधित माजी सैनिक व त्यांच्या पत्नी/ विधवा हयात असे पर्यंतच देय राहतील. तसेच अविवाहीत शहीद सैनिकांच्या बाबतीत त्यांचे आईवडील हयात असेपर्यंत हे लाभ देय राहतील.
४. इतर राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतरीत झालेल्या माजी सैनिकांचा सेवा कालावधी वगळून सातत्याने १५ वर्षे महाराष्ट्र राज्यात वास्तव्य असावे परंतू जर माजी सैनिकाने त्याच्या नावाची नोंदणी महाराष्ट्र राज्यात केली नसेल व त्यांचेजवळ इतर राज्यातील माजी सैनिक ओळखपत्र असेल तर ते या योजनेस पात्र ठरणार नाहीत. अशा माजी सैनिकांनी त्याच्या नावाची नोंदणी महाराष्ट्र राज्यातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात केलेल्या तारखेपासून १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच महाराष्ट्र राज्यातील माजी सैनिकांसाठी असलेल्या योजनेस पात्र ठरतील.
कल्याणकारी निधी :-(येथे क्लिक करा)
कृपया वेबसाइटवरून संबंधित फॉर्म डाउनलोड करा आणि नंतर पूर्ण भरलेला फॉर्म संबंधित कागदपत्रांसह ZSWO च्या कार्यालयात जमा करा. कृपया ZSWO वर फॉर्म जमा करताना तुमचे ESM ओळखपत्र, डिस्चार्ज/सर्व्हिस बुक आणि यलो कार्ड सोबत असल्याची खात्री करा.
प्रोफॉर्मा सी :-(येथे क्लिक करा)
ईएसएम वॉर्ड आणि विधवांसाठी कोटा प्रदान करणाऱ्या विविध संस्थांमध्ये प्रवेशासाठी प्रोफॉर्मा सी जारी केला जातो. १० वी नंतरच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी ESM श्रेणी अंतर्गत महाराष्ट्रात निश्चित ५% कोटा आहे. हा लाभ घेण्यासाठी फॉर्म खाली डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. कृपया फॉर्म पूर्ण करा आणि इच्छित प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कार्यालयात जमा करा.
कृपया लक्षात घ्या की हा लाभ महाराष्ट्रातील मूळ अधिवास असलेल्या, महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांच्या वॉर्डांना लागू आहे. मूळ अधिवास नसलेल्या ईएसएमसाठी, त्यांना महाराष्ट्रातून आय कार्ड मिळाल्यानंतर 15 वर्षांनी लाभ दिला जाईल.
Property Tax
Ben Fund
Proforma C
विशेष निधी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय ठाणे यांचे आखत्यारीत खालील ठिकाणी सैनिकी मुलांचे वसतिगृह/माजी सैनिक विश्रामगृह आहेत:- Googler Map Reference Add on Information
Military Boys Hostel – सैनिकी मुलांचे वसतीगृह
ज्ञानसाधना कॉलेजच्या शेजारी
नौपाडा, ठाणे
दूरध्वनी क्रमांक- 9769664830, mbhthane@gmail.com
सैनिकी मुलांचे वसतिगृह क्षमता – 54 मुले – 18 रुम
तीन हात नाका येथून सुरू होणाऱ्या सर्व्हिस रोडवरून प्रवेश आहे.
इटर्निटी मॉलसमोरील सर्व्हिस रोड जिथे ठाणे-नाशिक टॅक्सींचे काउंटर आहे
Military Rest House- सैनिकी विश्रामगृह
ज्ञानसाधना कॉलेजच्या शेजारी
नौपाडा, ठाणे
दूरध्वनी क्रमांक- 9769664830
मिलिटरी रेस्ट हाऊस – ३ x डॉर्मिटरी, ६ सुट (३ एसी/३ नॉन एसी)+एक व्हीआयपी एसी सूट
महाराष्ट्रातील इतर ठिकाणातील वसतिगृह व विश्रामगृह पाहणेकरीता खालील लिंक वर क्लिक करावे.
सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य :- https://mahasainik.maharashtra.gov.in/