बंद

जिल्ह्याविषयी

महाराष्ट्र राज्यातील काही मोजक्या औद्योगिकदृष्टया प्रगत जिल्हयापैकी ठाणे हा एक कोकण विभागातील उत्तरेकडचा जिल्हा असून जनगणना 2011 नुसार लोकसंख्येच्या दृष्टिने त्याचा राज्यात तिसरा क्रमांक आहे. जिल्हयाचे क्षेत्रफळ 4214 चौ.कि.मी. असून ते राज्याच्या 1.37 टक्के आहे. पूर्वेकडे सहयाद्री पर्वताच्या रांगा तर पश्चिमेस अरबी समुद्र , उत्तरेस गुजरात राज्याचा घनदाट अरण्याचा भाग आणि दक्षिणेला जगप्रसिध्द व भारताची आर्थिक राजधानी समजले जाणारे मुंबई शहर अशा जिल्हयाच्या चतु:सिमा आहेत. जिल्हयातील ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यांचे क्षेत्र औद्योगिक दृष्टया विकसीत असून मुंबई शहराच्या आधुनिक संस्कृतीच्या प्रभावाखाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या 720 कि.मी. किना-यापैकी 27 कि.मी. लांबीचा समुद्र किनारा जिल्हयाला लाभला आहे. भूजल मासेमारीसाठी 7642 हेक्टर क्षेत्र अनुकूल आहे. सागरी मासेमारी बरोबरच भूजल मासेमारी केली जाते. मत्स्य विक्रीसाठी मुंबई सारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध असून आखाती देशांतूनही मत्स्य उत्पादनाला चांगली मागणी आहे.
औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ठाणे जिल्हयाचा राज्यामध्ये तिसरा क्रमांक असून जिल्हयाच्या निम्म्यापेक्षा जास्त भागाचा आर्थिक व सामाजिक विकास हा औद्योगिकरणामुळे झाला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित 8 औद्योगिक वसाहती विकसीत केल्या आहेत. मुंबई सारखे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व सोयीचे बंदर, दळणवळणाच्या जलद सोयी आणि शासनामार्फत पुरविल्या जाणा-या सुविधा यामुळे जिल्हयामध्ये उद्योगधंदयाची भरभराट झालेली आहे. विशेषत: जिल्हयाच्या दक्षिण व पश्चिम भागामध्ये उद्योंगाचे केंद्रीकरण झालेले दिसून येते. जिल्हयामध्ये नोंदणी झालेल्या उद्योगात प्रामुख्याने रसायने व औषधे यांचे मोठया प्रमाणावर उत्पादन केले जाते. याशिवाय प्लॅस्टिकच्या वस्तू,लोखंडी साहित्य आणि पॉवरलूम कापड यांची निर्मिती करणारे मध्यम व छोटे उदयोग मोठया प्रमाणात चालू आहेत. महाराष्ट्रामध्ये इचलकरंजी नंतर भिवंडी येथील यंत्रमागावर कापड विणण्याचा व्यवसाय प्रसिध्द आहे. केंद्रशासन अंगिकृत दारुगोळा व शस्त्र निर्मितीचा कारखाना अंबरनाथ येथे आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे कुशल व अकुशल कामगारांना मोठया प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्हयामध्ये खनिज उत्पादन फारसे नसले तरी बांधकामासाठी रेती काढण्याचा व्यवसाय मुंब्रा, ठाणे, घोडबंदर या परिसरात मोठया प्रमाणावर चालतो.

दृष्टिक्षेपात जिल्हा

अ.क्र. बाब परिमाण जिल्हा
एक प्राकृतिक रचना
1 भौगोलिक स्थान
1.1 उत्तर अक्षांश अंश 18.42-20.20
1.2 पूर्व रेखांश अंश 72.45-73.48
1.3 क्षेत्रफळ हजार चौ.कि.मी. 4
2 प्रशासकीय रचना
2.1 तालुके संख्या 7
2.2 शहरे (गणना शहरांसह) संख्या 31
2.3 वस्ती असलेली गावे संख्या 807
2.4 वस्ती नसलेली गावे संख्या 13
(मुंबई व मुंबई उपनगर जिल्हयांमधील ३ तहसिल वगळून)
दोन स्थानिक स्वराज्य संस्था
1 महानगरपालिका संख्या 6
2 नगरपरिषदा संख्या 2
3 कटकमंडळे संख्या 0
4 पंचायत समित्या संख्या 5
5 ग्रामपंचायती संख्या 430
6 नगरपंचायत संख्या 0
(राज्य निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार)
तीन लोकसंख्या (जनगणना -2011)
1 ग्रामीण हजार 1117
2 नागरी हजार 6953
3 एकूण हजार 8070
4 पुरुष हजार 4319
5 स्त्रिया हजार 3751
6 स्रिया प्रति हजार पुरुष संख्या 868
7 अनुसूचित जातींची लोकसंख्या हजार 643
7.1 एकूण लोकसंख्येशी प्रमाण टक्के 7.97
8 अनुसूचित जमातींची लोकसंख्या हजार 424
8.1 एकूण लोकसंख्येशी प्रमाण टक्के 5.26
9 घनता (लोकसंख्या प्रति चौ.कि.मी.) संख्या 1915
10 साक्षरतेचे प्रमाण
10.1 ग्रामीण टक्के 78.49
10.2 नागरी टक्के 88.61
10.3 एकूण टक्के 87.24
10.4 पुरुष टक्के 90.57
10.5 स्त्रिया टक्के 83.37
10.6 साक्षरतेमध्ये महाराष्ट्राचा देशात क्रमांक क्रम संख्या पाचवा
11 दारिद्रय रेषेखालील ग्रामीण कुटुंबे (2002) लाख 0.72
चार जिल्हा उत्पन्न अंदाज
1 चालू किंमतीनुसार 2013-14
1.1 एकूण उत्पन्न (स्थूल) कोटी 200217
1.2 दरडोई उत्पन्न (स्थूल) 193107
1.3 एकूण उत्पन्न (निव्वळ) कोटी 179526
1.4 दरडोई उत्पन्न (निव्वळ) 173150
2 स्थिर (2004-05) किंमतीनुसार 2013-14
2.1 एकूण उत्पन्न (स्थूल) कोटी 124665
2.2 दरडोई उत्पन्न (स्थूल) 120238
2.3 एकूण उत्पन्न (निव्वळ) कोटी 111238
2.4 दरडोई उत्पन्न (निव्वळ) 107287
— पहिले सुधारित अंदाज
पाच कृषि (2009-10 अस्थायी)
1 भौगोलिक क्षेत्र हजार हेक्टर 409
2 जंगलव्याप्त क्षेत्र हजार हेक्टर 147
3 जंगलव्याप्त क्षेत्राचे भौगोलिक क्षेत्राशी प्रमाण टक्के 35.83
4 शेतीला उपलब्ध नसलेली जमीन
4.1 बिगर- शेती वापराखालील हजार हेक्टर 25
4.2 पडीत आणि लागवाडीलायक नसलेली हजार हेक्टर 35
4.3 एकूण हजार हेक्टर 60
5 पडीत जमिनीव्यतिरिक्त लागवड न केलेली इतर जमीन
5.1 कायम गुरेचरण व इतर हजार हेक्टर 6
5.2 झाडे-झुडपांखालील हजार हेक्टर 7
5.3 लागवडीलायक परंतु पडीत हजार हेक्टर 10
6 पडीत जमीन
6.1 चालू पड हजार हेक्टर 2
6.2 इतर पड हजार हेक्टर 7
7 पिकाखालील क्षेत्र
7.1 निव्वळ पेरणी क्षेत्र हजार हेक्टर 176
7.2 दुसोटा /तिसोटा क्षेत्र हजार हेक्टर 1
7.3 एकूण पिकाखालील क्षेत्र हजार हेक्टर 176
8 ओलिताखालील क्षेत्र / सिंचनाखालील क्षेत्र
8.1 निव्वळ ओलित क्षेत्र हजार हेक्टर 1
8.2 एकूण ओलित क्षेत्र हजार हेक्टर 1
9 महत्वाच्या पिकाखालील क्षेत्र
9.1 तृणधान्ये हजार हेक्टर 161
9.2 कडधान्ये हजार हेक्टर 1
9.3 तेलबिया हजार हेक्टर 0.2
9.4 ऊस(तोडणीक्षेत्र) हजार हेक्टर 0
9.5 कापूस हजार हेक्टर 0
10 पर्जन्य (सरासरी) 2015 मि.मी. 1884
11 जमीन वहिती धारण क्षेत्र
11.1 क्षेत्र 2 हेक्टरपेक्षा कमी हजार हेक्टर 139
11.2 क्षेत्र 2 ते 10 हेक्टर हजार हेक्टर 198
11.3 क्षेत्र 10 हेक्टरपेक्षा जास्त हजार हेक्टर 52
सहा अंशत: व पूर्णत:सिंचन क्षमता निर्माण झालेले पाटबंधारे प्रकल्प व त्यांखालील क्षेत्र
1 मोठे पाटबंधारे प्रकल्प संख्या 1
2 मध्यम पाटबंधारे प्रकल्प संख्या 0
3 लघु पाटबंधारे प्रकल्प (राज्यक्षेत्र) संख्या 16
4 लाभ क्षेत्रातील विहिरींद्वारे 2014-15 मधील अतिरिक्त सिंचन क्षेत्र हजार हेक्टर 0.8
सात पशुसंवर्धन (पशुगणना -2012)
1 एकूण पशुधन हजार 273
2 गो जातीय हजार 103
3 महिषवर्गीय हजार 98
4 मेंढया व शेळ्या हजार 64
5 कोंबडया व बदके हजार 2943
आठ सहकार क्षेत्र
1 सहकारी संस्था संख्या 24135
2 प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था संख्या 178
2.1 सभासद संख्या हजार 94
2.2 दिलेली कर्जे लाख ` 4177
2.2 येणे कर्जे लाख ` 2567
3 सहकारी दुग्धसंस्था (31 मार्च, 2015 अखेर) संख्या 142
नऊ वीज
1 विद्युतीकरण झालेली गावे संख्या 807
2 वीज पुरवठा केलेले कृषी पंप संच हजार 0.1
3 विजेचा वापर 2015-16
3.1 घरगुती दशलक्ष कि.वॅ.तास 2899
3.2 वाणिज्यिक दशलक्ष कि.वॅ.तास 853
3.3 औद्योगिक दशलक्ष कि.वॅ.तास 3977
3.4 कृषि दशलक्ष कि.वॅ.तास 18
3.5 इतर दशलक्ष कि.वॅ.तास 651
3.6 एकूण दशलक्ष कि.वॅ.तास 8398
दहा परिवहन व दळणवळण
1 रेल्वे मार्गाची एकूण लांबी कि.मी. 545
 — रेल्वे मार्गाची एकूण लांबी अविभाजीत ठाणे जिल्हयांची आहे.
2 रस्त्यांनी जोडलेली गावे (31/03/2015 अखेर)
2.1 बारमाही संख्या 800
2.2 हंगामी संख्या 5
3 रस्त्यांची लांबी (पृष्ठांकित)
3.1 राष्ट्रीय महामार्ग कि.मी. 200
3.2 राज्य महामार्ग (प्रमुख राज्य महामार्गासह ) कि.मी. 302
3.3 प्रमुख जिल्हामार्ग कि.मी. 338
3.4 इतर जिल्हामार्ग कि.मी. 2898
3.5 ग्रामीण रस्ते कि.मी. 2493
3.6 एकूण कि.मी. 6231
— राज्य महामार्गात प्रमुख राज्य महामार्गाचा समावेश आहे.
अकरा नोंदणीकृत कारखाने व रोजगार
1 नोंदणीकृत कारखाने (2014) संख्या 8800
2 नोंदणीकृत चालू कारखाने (2014) संख्या 8494
(त्यांतील कामगार) (2014) संख्या 419232
3 सहकारी सूत गिरण्या संख्या 0
बारा कर्मचारी गणना (31 मार्च, 2015 रोजी भरलेली पदे) (अस्थायी)
1 शासकीय हजार 9
2 जिल्हा परिषदा हजार 0
3 नगर परिषदा हजार 0
4 महानगरपालिका(मुंबई म.न.पा.वगळून) हजार 0
— जिल्हा परिषदांच्या कर्मचा-यांच्या माहितीचे काम अपूर्ण आहे. — न.पा. व म.न.पा.च्य कर्मचा-यांचा माहितीकोष अद्ययावत करण्यांचे काम हाती घेण्यांत आलेले नाही.
तेरा शिक्षण क्षेत्र
1 प्राथमिक शिक्षण (1ते 8 वी)
1.1 एकूण शाळा संख्या 3287
1.2 विद्यार्थी हजार 851
1.3 शिक्षक हजार 22
1.4 प्रति शिक्षक विद्यार्थी संख्या 38
2 माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक सह)
2.1 एकूण शाळा संख्या 1402
2.2 विद्यार्थी हजार 737
2.3 शिक्षक हजार 19
2.4 प्रति शिक्षक विद्यार्थी संख्या 38
3 उच्च शिक्षण
3.1 संस्था संख्या 91
3.2 एकूण विद्यार्थी हजार 81
4 तांत्रिक व व्यवसाय शिक्षण 2015-16
4.1 व्यवसाय पदवी शिक्षण संस्था संख्या 10
(प्रवेश क्षमता) संख्या 3600
4.2 व्यवसाय पदविका शिक्षण संस्था संख्या 12
(प्रवेश क्षमता ) संख्या 4192
4.3 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(2014-15) संख्या 10
(प्रवेश क्षमता) संख्या 3188
4.4 अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (2014-15)(विना अनुदानित ) संख्या 9
(प्रवेश क्षमता) संख्या 539
चौदा सार्वजनिक आरोग्य 2015
1 रुग्णालये संख्या 10
2 दवाखाने संख्या 3
3 प्राथमिक आरोग्य केंद्रे संख्या 33
4 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे संख्या 187
5 प्राथमिक आरोग्य पथके संख्या 0
 — डिसेंबर, 2015 पर्यंत
पंधरा आदिवासी कल्याणकारी योजना
1 आदिवासी आश्रमशाळा (शासकीय व अनुदानित ) संख्या 23
(त्यांतील विद्यार्थी) संख्या 8988
सोळा मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना
1 मागासवर्गीयांसाठी वसतिगृहे (शासकीय व अनुदानित ) संख्या 10
(त्यांतील विद्यार्थी) संख्या 857
सतरा सार्वजनिक वितरण व्यवस्था
1 रास्त भावाची दुकाने संख्या 1842
2 पुरविलेला एकूण साठा
2.1 गहू लाख टन 1.23
2.2 तांदूळ लाख टन 1.02
3 शासकीय गोदामे संख्या 15
(साठवण क्षमता) हजार टन 7.5
आधार- 1. अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई. 2. जिल्हा सांख्यिकी कार्यालय, ठाणे.