बंद

पुरवठा विभाग

परिचय :

     जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील आणि दूर्गम भागातील पात्र कुटुंबांना निवडक जीवनावश्यक वस्तू सवलतीच्यादरामध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था हे एक माध्यम आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था ही केंद्र व राज्य शासन यांच्या संयुक्त जबाबदारीने चालविली जाते. या योजनेची माहिती सर्व नागरिकांना असणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच सदर योजना प्रभावीपणे व पारदर्शकतेने राबविण्यासाठी आपला म्हणजेच नागरिकांचा सहभाग अत्यंत मोलाचा आहे. या विभागामार्फत देण्यात येणा-या विविध प्रकारच्या लोकोपयोगी सेवा, त्याचे निकष, कालमर्यादा तसेच तक्रार निवारण पध्दत याबाबतची माहिती नगरिकांना असावी यासाठी खालील माहिती प्रदर्शित करण्यात येत आहे. यामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शी व अधिक बळकट होईल अशी अपेक्षा आहे. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा, ग्राहक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी, ही प्रमुख कार्य पार पाडतांना त्यात नागरिकांचा सहभाग मिळण्याच्या दृष्टिने सदर माहिती निश्चितच उपयुक्त ठरेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व संगणकीकरणाच्या माध्यमातून सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक प्रभावी, परिणामकारक व सक्षम करावयाची शासनाची तयारी आणि त्याला नागरीकांच्याा माध्यमातून अधिक सशक्त करण्याच्या हेतूने नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागाची जोड देऊन सदर यंत्रणा लोकाभिमुख, प्रतिसादशील व गतिमान होईल.

उद्दिष्ट :-

जीवनावश्यक वस्तू रास्तभावात आणि ठराविक प्रमाणात उपलब्ध करून देण्याकरिता “सार्वजनिक वितरण व्यवस्था” अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागामार्फत कार्यान्वित केलेली आहे.

जिल्हास्तरावरील प्रशासकीय रचना:-

 

supply dept

लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत सर्व टप्प्यांवर अधिक पारदर्शकता आणण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमित व विहित कालावधीत अन्नधान्य पोहोचविण्याकरिता पहिल्या टप्याची वाहतुक भारतीय अन्न महामंडळाच्या बेस डेपोपासून शासकीय धान्य गोदामापर्यंत, दुसऱ्या टप्याची वाहतुक शासकीय धान्य गोदाम ते रास्त भाव धान्य दुकानांपर्यंत तसेच थेट वाहतुक भारतीय अन्न महामंडळाच्या बेस डेपोपासून ते थेट रास्त भाव धान्य दुकानापर्यंत वाहतूक कंत्राटव्दाराव्दारे शासकीय खर्चाने अन्नधान्याची वाहतूक करण्यात येते.

जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या आखत्यारीतील शासकीय धान्य गोदाम

.क्र. शासकीय धान्य गोदाम साठवणूक क्षमता
1 शासकीय धान्य गोदाम, अंबरनाथ 1000 मे.ट.
2 शासकीय धान्य गोदाम, कल्याण 2000 मे.ट.
3 शासकीय धान्य गोदाम, भिवंडी 2000 मे.ट.
4 शासकीय धान्य गोदाम, शहापूर 1500 मे.ट.
5 शासकीय धान्य गोदाम, मुरबाड 1580 मे.ट.
एकुण 8080 मे..

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015.

क्रमांक  संकीर्ण 1014/प्र.क्र.-176 (भाग-1) नापु-12. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 (2015 चा नहा.31) याच्या कलम 3 च्या पोट-कलम (1) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, आणि शासकीय अधिसूचना, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्रमांक संकीर्ण 1014/1306/प्र.क्र.- 176/ नापु-12, दिनांक 14 ऑक्टोबर, 2015 चे अधिक्रमण करुन, अन्न. नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, याव्दारे, उक्त अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दुय्यम  अधिकान्यांद्वारे पात्र व्यक्तींना पुरवावयाच्या, यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (2) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या लोकसेवा तसेच उक्त अनुसूचीच्या अनुक्रमे स्तंभ (3), (4), (5) व (6) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे अशा लोकसेवा पुरविण्याची ठराविक कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपीलीय प्राधिकारी व द्वितीय अपीलीय प्राधिकारी अधिसूचित कारीत आहे.

अनुसूची

अ.क्र.

 

लोकसेवेचे नाव

 

सेवा पुरविण्याची कालमर्यादा (कामाचे)

 

ज्याच्याकडून सेवा पुरविण्यात येईल तो पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपीलीय प्राधिकारी द्वितीय अपीलीय प्राधिकारी
1 नवीन शिधापत्रिका मागणी 30 दिवस शिधावाटप अधिकारी/ क्षेत्रीय अधिकारी तहसिलदार/ अन्नधान्य वितरण अधिकारी सहायक नियंत्रक शिकावाटप/ अन्नधान्य वितरण अधिकारी/ जिल्हा पुरवठा अधिकारी उप नियंत्रक, शिधावाटप / उप आयुक्त (पुरवठा)
2 1.शिक्षपत्रिकेतील नावाची दुरुस्ती

 

 

 

 

 

2.शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करने

 

 

 

 

 

3.शिधापत्रिकेतील नाव कमी करणे

 

 

4.शिधापत्रिकेवरील पत्ता बदलणे.

3 कामाचे दिवस

 

 

 

 

 

गृह भेट आवश्यक असल्यास, 30 दिवस, अन्यथा 3 कामाचे दिवस

 

3 कामाचे दिवस

 

 

30 दिवस,

शिधावाटप अधिकारी/ क्षेत्रीय अधिकारी तहसिलदार/ अन्नधान्य वितरण अधिकारी सहायक नियंत्रक शिकावाटप/ अन्नधान्य वितरण अधिकारी/ जिल्हा पुरवठा अधिकारी उप नियंत्रक, शिधावाटप / उप आयुक्त (पुरवठा)
3 1.दुय्यम शिधापत्रिका (खराब /फाटलेली इत्यादी)

 

 

 

2.दुय्यम  शिधापत्रिका (शिधापत्रिका गहाळ झाल्यास)

गृह भेट आवश्यक असल्यास, 30 दिवस, अन्यथा 6 कामाचे दिवस

 

30 दिवस,

शिधावाटप अधिकारी/ क्षेत्रीय अधिकारी तहसिलदार/ अन्नधान्य वितरण अधिकारी सहायक नियंत्रक शिकावाटप/ अन्नधान्य वितरण अधिकारी/ जिल्हा पुरवठा अधिकारी उप नियंत्रक, शिधावाटप / उप आयुक्त (पुरवठा)
4 नवीन रास्तभाव दुकान परवाना उद्घोष्णेनंतर 180 दिवस, नियंत्रक शिकावाटप/ अन्नधान्य वितरण अधिकारी/ जिल्हा पुरवठा अधिकारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी प्रधान सचिव/ सचिव विभागीय आयुक्त
5 रास्तभाव दुकानाच्या परवान्याचे नूतनीकरण 90 दिवस, उप नियंत्रक शिकावाटप/ अन्नधान्य वितरण अधिकारी/ जिल्हा पुरवठा अधिकारी नियंत्रक शिधावाटप जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त
6 किरकोळ केरोसीन विक्री परवाना 180 दिवस, अन्नधान्य वितरण अधिकारी/ जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त
7 किरकोळ केरोसीन विक्रीच्या परवान्याचे नूतनीकरण 90 दिवस, अन्नधान्य वितरण अधिकारी/ जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त

पुरवठा विभागाकडील योजना

  1. प्राधान्य कुटुंब योजना (पी.एच.एच.) :-

दि. 1 फेब्रुवारी, 2014 पासून राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यानुसार  लाभार्थ्यांचे अंत्योदय गट व प्राधान्य गट असे दोन गट अस्तित्वात आले असून प्राधान्य गटाच्या लाभार्थ्यास प्रतिमाह प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येते.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी निकष ठरवितांना लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभ घेत असलेल्या (ब-1) मधील लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांनी सन 2011 मध्ये विहित नमुन्यात वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नमूद केले आहे, त्या उत्पन्नानुसार शहरी भागात कमाल रु. 59,000/- पर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा पात्र लाभार्थी म्हणून व ग्रामीण भागात कमाल रु. 44,000/- पर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा पात्र लाभार्थी म्हणून समावेश करणेबाबत दिनांक 17.12.2013 च्या शासन निर्णयान्वये निर्णय घेण्यात आला आहे. सदर लाभार्थ्यांकडील केशरी शिधापत्रिकांवर प्रथम पृष्ठावर “वरील उजव्या कोपऱ्यात” “प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी” असा शिक्का मारण्यात आला आहे.

 

  1. अंत्योदय अन्न योजना (ए.ए.वाय.) :-

सर्वात गरीब कुटुंबांना या योजनेंतर्गत दि.01.05.2001 पासून अन्नधान्य पुरवले जाते.या योजनेंतर्गत, विधवा किंवा अशक्त आजारी व्यक्ती किंवा अपंग व्यक्ती किंवा 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्ती किंवा एकल महिला किंवा कोणतेही सामाजिक समर्थन अथवा उदरनिर्वाहाचे साधन नसलेले अविवाहित पुरुष. सर्व आदिम आदिवासी कुटुंबांना प्राधान्य दिले गेले.  तसेच या योजनेंतर्गत, खालील श्रेणीतील कुटुंबे ओळखली गेली आहेत आणि त्यांना अन्नधान्य दिले जाते. (अ) स्वमालकीची जमीन नसलेले शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर/कारागीर जसे की कुंभार, चर्मकार, विणकर, लोहार, सुतार, झोपडपट्टीतील रहिवासी, कुली, रिक्षाचालक यांसारख्या अनौपचारिक क्षेत्रात दररोज आपली उपजीविका करणाऱ्या व्यक्ती. गाड्या ओढणारे, फळे आणि फुलांचे विक्रेते, सर्पमित्र, चिंध्या वेचणारे, मोची, निराधार आणि ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांतील इतर तत्सम श्रेणी.  सरकारने दि.11.09.2009 रोजी एचआयव्ही/एड्स व्यक्ती आणि कुष्ठरोगग्रस्त व्यक्तींना प्राधान्याने ए.ए.वाय. रेशनकार्ड देण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे, ज्यांची नावे बीपीएल यादीत आहेत त्यांना देखील समाविष्ट करण्याच्या सूचना आहेत.

 

  1. शिवभोजन योजना :-

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने              दि.01 जानेवारी, 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये शिवभोजन योजना दि. 26.01.2020 पासून सुरु केली आहे. शिवभोजन थाळीमध्ये 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 वाटी वरण व 1 मूद भाताचा समावेश आहे. शिवभोजन योजना कार्यान्वित करण्यासाठी “शिवभोजन ॲप्लिकेशन” विकसित करण्यात आले आहे. त्याचा वापर करुनच शिवभोजन थाळी वितरीत करण्यात येते. शिवभोजन थाळ्या वितरीत करण्यापूर्वी लाभार्थ्याचे नाव व फोटो घेणे बंधनकारक आहे तर फोन नंबर वैकल्पिक आहे. या ॲपवर शिवभोजन केंद्र चालकास रोजचा मेन्यू प्रसिद्ध करता येतो.

.क्र. तालुका शिवभोजन केंद्राचे नाव व पत्ता केंद्राकरीता मंजुर थाळींची संख्या (दैनंदिन)
 

 

 

1

 

 

 

शहापुर

 

1

शेटे डेकोरेटर्स, खालचा नाका, डीएनएस बँकेजवळ, नगरपंचायत शहापूर. 200
 

2

मोहन मारूती जाधव, ग्रा.घर क्र.26, अमोघ अपार्टमेंट, वाशिंद बस स्थानकासमोर, वाशिंद (प) ता. शहापूर 100
 

3

दशरथ बी. ठाकरे, सह्याद्री हॉटेलजवळ, पडवळ अपाटमेंट, डोळखांब ता. शहापूर 100
 

2

 

भिंवडी

 

4

शिवभोजन केंद्र पडघा, गाला न.11, मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्स, ग्रामपंचायत कार्यालयासमोर पडघा, ता. भिवंडी 100
 

3

 

मुरबाड

 

5

शिवालय पोळी भाजी केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समिती, गाला न.01 ता. मुरबाड, जि.ठाणे 100

 

  1. फोर्टिफाईड राईस (गुणसंवर्धीत तांदुळ) :-

देशात आणि राज्यात मोठया प्रमाणावर असलेल्या ॲनिमिया या समस्येवरील उपाय म्हणून पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळाचे दाणे (फोर्टिफाइड राईस केरने l- एफआरके) (जे तांदळाच्या पीठापासून बनलेले असतात व ज्यात मोठ्या प्रमाणात लोह, फॉलिक ॲसिड व व्हिटामिन B12 यांसारख्या सूक्ष्म पोषकद्रव्यांचा समावेश असतो ) सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत वाटप होणाऱ्या सर्वसाधारण तांदळात 1 (एफआरके) : 100 (सर्वसाधारण तांदळाचे दाणे) याप्रमाणात मिसळून, तयार होणारा फोर्टिफाईड तांदूळ (पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ) वितरीत करण्याचा निर्णय केंद्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. यानुसार केंद्र शासनाने दि.18 एप्रिल, 2022 रोजीच्या पत्रान्वये 100% केंद्र शासनाच्या आर्थिक सहाय्याने पीडीएस अंतर्गत लाभार्थ्यांना फोर्टिफाईड तांदूळ वितरण करण्यास मंजुरी दिलेली आहे.

पणन हंगाम 2024-25 मधील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानाची भरडाई साठी ठाणे जिल्यात जिल्हा मार्केटिंग अधिकारी व प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ मर्या. जव्हार या दोन अभिकर्ता संस्था कार्यरत आहेत.

 

  1. किमान आधारभूत किंमत (एम.एस.पी.) :-

किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासन निरनिराळया पिकांच्या किमान आधारभूत किंमती जाहीर करते. आधारभूत किंमतीचा लाभ शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने (डीस्ट्रेस सेल) धान्य विकावे लागू नये, म्हणून राज्य शासनातर्फे एफ.ए.क्यू (वाजवी सरासरी गुणवत्ता) दर्जाच्या धानाची/भरडधान्याची खरेदी करण्यात येते. महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाची “नोडल एजन्सी ” म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहते. भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने राज्य शासन या योजनेची अंमलबजावणी राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई (बिगर आदिवासी क्षेत्रात) व महाराष्ट्र राज्य सहाकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक (आदिवासी क्षेत्रात) या दोन अभिकर्ता संस्थांमार्फत करते.

  • ठाणे जिल्हयात तालुकानिहाय मंजुर एकुण 608 रास्त भाव दुकाने.
.क्र. तालुक्याचे नाव मंजुर रास्त भाव दुकाने
1 अंबरनाथ 40
2 कल्याण 43
3 भिवंडी 158
4 मुरबाड 196
5 शहापूर 171
एकुण 608
  • धान्य वितरण परिमान (आकडे किलोमध्ये, माहे सप्टेंबर-2025 अखेर )
अंत्योदय अन्न योजना (शिधापत्रीकानिहाय) प्राधान्य कुटुंब लाभार्थी (व्यक्तीनिहाय)
गहु तांदुळ एकुण गहु तांदुळ एकुण
10 25 35 1 4 5
  • माहे सप्टेंबर 2025 अखेर कार्डसंख्या व लोकसंख्या
.

क्र.

 

तालुका नाव

योजनेचे नाव

प्राधान्य कुटंब योजना (PHH)

योजनेचे नाव

अंत्योदय अन्न योजना (AAY)

एकुण

PHH+AAY

कार्डसंख्या लोकसंख्या कार्डसंख्या लोकसंख्या कार्डसंख्या लोकसंख्या
1 अंबरनाथ 9790 39318 4086 12480 13876 51798
2 भिवंडी 34335 147981 11637 38433 45972 186414
3 कल्याण 12738 53444 2831 8860 15569 62304
4 मुरबाड 24033 105708 11235 36262 35268 141970
5 शहापूर 33537 151339 18791 67062 52328 218401
एकुण 114433 497790 48610 163097 163013 660887
  • ठाणे जिल्ह्या(ग्रामीण) क्षेत्राकरीता मासिक धान्याची आवश्यकता (नियतन) (आकडे क्विंटलमध्ये)
अंत्योदय अन्न योजना (शिधापत्रीकानिहाय) प्राधान्य कुटुंब लाभार्थी

(व्यक्तीनिहाय)

एकुण (अंत्योदय अन्न योजना + प्राधान्य कुटुंब लाभार्थी)
गहु तांदुळ एकुण गहु तांदुळ एकुण गहु तांदुळ एकुण
4890 12210 17100 4960 19850 24810 9850 32060 41910

शिधापत्रिका अर्ज नमुना
https://rcms.mahafood.gov.in/

शिधापत्रिका व्यवहार आणि शिधापत्रिका संबंधित तपशील तपासण्यासाठी
https://mahaepos.gov.in

तक्रार
https://mahafood.gov.in/
https://mahafood.gov.in/service-category/online-grievance-redressal-system/

  • कार्यालयाचा पत्ता:-
    दुसरा मजला, नियोजन भवन,
    जिल्हा पुरवठा कार्यालय ठाणे,
    कोर्ट नाका, ठाणे पश्चिम