संजय गांधी निराधार योजना
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत
संजय गांधी निराधार योजना
तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे
Email ID – sgycollectorofficethane01@gmail.com
केंद्र शासन पुरस्कृत :
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना
राज्य शासन पुरस्कृत :
- संजय गांधी निराधार अनुदान योजना
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
ठाणे जिल्हा स्तरीय यंत्रणा
- ठाणे ग्रामीण
- ठाणे शहरी
- भिवंडी ग्रामीण
- भिवंडी शहरी
- कल्याण ग्रामीण
- कल्याण शहरी
- मुरबाड
- शहापुर
- उल्हासनगर
- अंबरनाथ ग्रामीण
- अंबरनाथ शहरी
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
निकष :
- दारिद्रय रेषेखलील कुटुंबातील १८ ते ६४ वर्ष वयोगटातील कोणत्याही कमावत्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यास, मृताच्या कुटुंबाला /वारस लाभार्थीला एक रकमी लाभ दिला जातो.
- केंद्र शासनामार्फत एक रकमी रुपये २०,०००.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना
निकष :
- ६५ व ६५ वर्षावरील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेले वृध्द निराधार स्त्री व पुरुष लाभार्थी.
- केंद्र शासनामार्फत रुपये २००/५०० (८० वर्ष व त्यापेक्षा अधिक लाभार्थीस रुपये ५००) राज्य शासनामार्फत रुपये १,३००/१,००० (श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजने मधुन) असे एकूण रुपये 1,500 अनुदान.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना
निकष :
- दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये नाव असलेल्या ४० ते ६५ वर्ष वयोगटातील विधवा लाभार्थी.
- विधवा महिला, घटस्फोटीत महिला, परित्यक्त्या महिला, अत्याचारित व वैश्या, तृतीयपंथी लाभार्थी.
- १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना रुपये २०० व २ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना रुपये ३०० (राज्य शासनामार्फत रुपये 1,300/१,२००) अस एकुण रुपये 1,500 अनुदान.
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना
निकष :
- १८ ते ६५ वर्ष वयोगटातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेले लाभार्थी.
- ८०% टक्क्याहून जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्ती.
- केंद्र शासनामार्फत रुपये ३०० (राज्य शासनामार्फत रुपये १२००) एकुण रुपये १५०० अनुदान.
संजय गांधी निराधार अनुदान योजना
निकष :
- ६५ वर्षापेक्षा कमी वय असलेला लाभार्थी.
- वार्षिक उत्पन्न रुपये २१,००० व दिव्यांग लाभार्थ्यासाठी रुपये 50,000 असावे.
- दिव्यांग, दुर्धर रोगग्रस्त, निराधार पुरुष/महिला, विधवा घटस्फोटीत, परित्यक्त्या महिला, अनाथ मुले, तृतीयपंथी लाभार्थी.
- राज्य शासनामार्फत रुपये १,२००/१,300 (केंद्र शासनमार्फत रुपये ३००/२००) व रुपये १,५०० असे एकुण रुपये १,५०० अनुदान.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
निकष :
- ६५ व ६५ वर्षावरील लाभार्थी.
- दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव नसलेल्या व रुपये २१,००० पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या वयोवृध्द निराधार स्त्री व पुरुष लाभार्थी.
- राज्य शासनामार्फत रुपये १,०००/१,३००/१,५०० (केंद्र शासनामार्फत रुपये ५००/२००) असे एकुण रुपये १५०० अनुदान.
राज्य शासन पुरस्कृत व केंद्र शासन पुरस्कृत योजनेकरिता आवश्यक असलेले दस्तऐवज
- कुटुंबाचे नाव ग्रामीण/शहरी भागाच्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रूपये ५०,०००/- तर इतर सर्व लाभार्थ्यांकरीता रूपये २१,०००/-पर्यंत असावे.
- रहिवाशी दाखला (ग्रामसेवक/ग्राम महसूल अधिकारी/मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या दाखला ग्राहय धरण्यात येईल) सदर दाखला सेतू तसेच महा ई-सेवा यांचेमार्फत प्राप्त करून घेता येईल.
- अपंगाचे प्रमाणपत्र (अस्थिव्यंग, अंध, मुकबधिर, कर्णबधिर, मतिमंद यांचे अपंगत्वाबाबत अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ मधील तरतुदीप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हील सर्जन) यांचे प्रमाणपत्र
- अनाथ असल्याचा दाखला (ग्रामसेवक/मुख्याधिकारी/प्रभाग अधिकारी यांनी दिलेला व गटविकास अधिकारी/प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी सांक्षाकित केलेला दाखला.
- पतीचा मृत्यू दाखला. (विधवा लाभार्थी साठी).
- रेशनकार्ड
- आधार कार्ड
- मुलांचे जन्म दाखले/मुलांच्या वयाचा पुरावा.
- अर्जदाराचा वयाचा पुरावा.
- कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसल्याबाबत दाखला (जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांचा दाखला (विधवा लाभार्थी साठी).
- नावात बदल असलेबाबतचा पुरावा.
- 2 फोटो